Nagpur Fire: नागपुरातील कंपनीत भीषण आग; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावत ते नष्ट करत असताना ही आग लागल्याची घटना घडली

Nagpur Fire: नागपुरातील कंपनीत भीषण आग; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नागपूर जवळील बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीने उत्पादित केलेल्या टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावत ते नष्ट करत असताना ही आग लागल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

सकाळी सातच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली आहे. टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावत असताना अचानक या साहित्यातून जोरदार ज्वाला निघाली. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले. जखमी कामगारांना तात्काळ नागपुरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला. प्रतिक कळसकर असे मृत कामगाराचे नाव आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 11:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).