मुंबई: सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल रेल्वेच्या दुस-या कोचची ट्रॉली रुळावरून घसरली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी दिली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

सीएसएमटी स्थानकात (CSMT Railway Station) आज एक मोठी दुर्घटना होता होता टळली. या स्थानकातून सुटलेली CSMT-Hydrabad स्पेशल रेल्वेच्या दुस-या कोचची ट्रॉली रुळावरून घसरली. रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी दिली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली असून रेल्वे सीएसएमटी-भायखळा दरम्यान खोळंबल्या आहेत.

जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री 10 च्या सुमारास 02701 सीएसएमटी-हैदराबाद विशेष ट्रेनच्या दुस-या कोचची ट्रॉली रुळावरून घसरली. हा दुर्घटना ही रेल्वे सीएसएमटी स्थानकातून सुटताना घडली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी दिली आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.हेदेखील वाचा- Mumbai Local Trains: मुंबई लोकलमधून 'या' वेळेत प्रवास केल्यास सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागेल इतका दंड

या घटनेमुळे 07617 Nanded-CSMT विशेष रेल्वे भायखळ्याला, 02533 Lucknow-CSMT रेल्वे दादरला आणि 02120 Karmali-CSMT रेल्वे ठाण्याला काही काळासाठी थांबविण्यात आल्या आहेत. हे ट्रॉली हटविण्याचे काम सुरु असून लवकरच ही वाहतूक सुरळीत सुरु होईल.

सीएसएमटी-हैदराबाद रेल्वे सीएसएमटी रेल्वे स्ठानकातून सुटताना हा अपघात घडल्याने परिसरात गोंधळ उडाला. मात्र मध्य रेल्वे ही परिस्थिती लवकरच आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान उद्यापासून सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्यासाठी विशेष वेळ ठरवून देण्यात आली आहे. यामुळे त्यांना त्या वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवासी वेळ चुकवल्यास त्यांच्याकडून 200 रुपयांचा दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास या शिक्षेचा सामना करावा लागणार आहे.