COVID19: कोरोनाशी लढण्यासाठी 1.25 लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोनाला (Coronavirus) रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सुमारे सव्वालाख आयुष डॉक्टरांना (Ayush Doctors) आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आ
कोरोनाला (Coronavirus) रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातील सुमारे सव्वालाख आयुष डॉक्टरांना (Ayush Doctors) आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत राज्यचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ट्विट च्या मध्यातून तसेच फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून माहिती दिली आहे. राज्यात वैद्यकीय आवश्यकता भासल्यास पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे याची खबरदारी म्ह्णून राज्यातील आर्युवेदिक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल. तूर्तास, आयुषच्या 250 मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात Lock Down वाढणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर
दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैद्यकीय उपकरणाच्या बाबतही माहिती देत राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे 25 हजार पीपीई कीट्स, दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध असल्याचे सांगितले तसेच लवकरच आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असून आवश्यकता भासल्यास केंद्र शासनाकडून उपकरणांचा पुरवठा राज्याला केला जाईल, असेही टोपे यांनी सागितले.
राजेश टोपे ट्विट
दरम्यान, कोरोनाचे संकट वेगाने पसरत आहे, याला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःला शिस्त लावली पाहिजे , सोशल डिस्टंसिंग राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असे उपाय करावेत तास आहार आणि पथ्य पाळावे. सध्या महाराष्ट्रात 145 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची संख्या 635 वर गेली आहे. यापैकी 52 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण 32 जणांचा मृत्यू झाला आहे.