Omicron: मुंबईत मॉल आणि रेस्टॉरंट मध्ये लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मिळणार प्रवेश

यामुळेच महापालिकेकडून त्याच्या विरोधात योग्य पावले उचलली जात आहेत. त्याचसोबत महापालिकेने पुन्हा एकदा कोविड19 संदर्भातील नियम अधिक कठोरपणे लागू करण्यास सुरुवात केली आहे.

Coronavirus Outbreak | (Photo Credit: PTI)

Omicron: मुंबईत ओमिक्रॉनच्या वेरियंटच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. यामुळेच महापालिकेकडून त्याच्या विरोधात योग्य पावले उचलली जात आहेत. त्याचसोबत महापालिकेने पुन्हा एकदा कोविड19 संदर्भातील नियम अधिक कठोरपणे लागू करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता मुंबईतील मॉल आणि रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर कोविड19 चे पूर्णपणे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.

परंतु ज्या नागरिकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांना मॉल आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे. मॉलच्या प्रबंधकांकडून हे नियम सक्तीने लागू करण्यास सुरुवात केली आहे. कारण वेळोवेळी महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या टीमकडून त्याचे निरिक्षण केले जात आहे.(Navi Mumbai Fraud: बनावट कोविड लसीचे प्रमाणपत्र विकल्याप्रकरणी नवी मुंबईत 3 जणांना अटक, APMC पोलिसांची कारवाई)

राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या गाडइलाइन्सनुसार, पूर्णपणे लसीकरण झालेल्यांनाच मॉल मध्ये प्रवेश देण्यात यावा असे सांगितले होते. याच दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाल्याने नियमात सूट दिली गेली. परंतु आता कोरोनाच्य नव्या वेरियंटमुळे रुग्णांची संख्या पुन्हा एकदा आकडा वाढू लागला आहे. यामुळे आता महापालिका सक्तीने नियम लागू करत आहे.

मुंबईतील काही मॉलमध्ये लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांचे प्रमाणपत्र पाहिले जात आहे. ज्या नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे. परंतु लसीकरण झाले नसल्यास नागरिकांना प्रवेश नाकारला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif