सीएम उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट; नवी मुंबई येथील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडियावरील या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्या फोटोमध्ये छेडछाड (Morphed Photo) केली गेली आहे. सीएम आणि कॅबिनेट मंत्री यांच्याविरोधात केलेल्या पोस्टच्या बाबतीत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर नोंदविला असल्याचे सांगण्यात आले. ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला गेला होता, त्यात उद्धव ठाकरे यांच्या फोटोमध्ये छेडछाड करून त्यांना एका मौलवीप्रमाणे दर्शवले आहे. या प्रकरणी नवी मुंबई येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
पेशाने वकील असलेले शिवसेना कार्यकर्ते धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याबाबत एफआयआर नोंदवला होता. मिश्रा यांनी आरोप केला होता की, या महिलेने 25 जुलै आणि 28 जुलै रोजी आपल्या अनेक ट्वीटद्वारे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. आता या प्रकरणी भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक न्यायालयाने तिला गुरुवारी जामीन मंजूर केला. याबाबत रश्मी करंदीकर, पोलिस उपायुक्त (सायबर), मुंबई पोलिस गुन्हे शाखा, यांनी माहिती दिली. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 'औरंगजेब', तर आदित्य ठाकरे यांचा Baby Penguin उल्लेख करत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; समीत ठक्कर नामक व्यक्तीवर व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये मिश्रा म्हणतात. 'ट्विटर बायोमध्ये ही महिला स्वतःला @Bharat_niti ची कोर कमिटी सदस्य म्हणून संबोधित करते, जे भाजपच्या IT cell शी निगडीत आहे. ट्विटरवरील तिच्या अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्टमुळे केवळ मुख्यमंत्रिपदाचाच अपमान होत नाही तर, धार्मिक गटांमधील वैर देखील वाढते. स्वातंत्र्याच्या चुकीच्या दुरुपयोगाचे हे उत्तम उदाहरण आहे.' दरम्यान, गेल्या महिन्यात व्ही.पी. रोड पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबत आक्षेपार्ह शब्द वापरणे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली नागपूर व्यावसायिकाविरूद्ध गुन्हा दाखल केला)