IPL Auction 2025 Live

Laxman Hake Demands Cabinet Post in Mahayuti Govt: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची महायुती सरकारमध्ये कॅबिनेट पदाची मागणी; मनोज जरांगे यांच्यावरही साधला निशाणा

या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महायुती सरकारकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे.

Laxman Hake (फोटो सौजन्य -X/@ThePuneMirror)

Laxman Hake Demands Cabinet Post in Mahayuti Govt: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) महाविकास आघाडीचा पराभव करत महायुती पुन्हा सत्तेत आली. महायुतीच्या ऐतिहासिक विजयात लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) यशासह ओबीसी समाजाकडून (OBC Community) मिळालेला मोठा पाठींबा महत्त्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी महायुती सरकारकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. राज्याच्या 50 टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दिलेले योगदान गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारख्या प्रभावशाली पदासाठी पात्र ठरते, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

मला फक्त विधानपरिषदेत जागा नको आहे. मला कॅबिनेट मंत्रालय - गृह, वित्त किंवा इतर कोणताही महत्त्वाचा मंत्री करा. मी यासाठी पात्र आहे कारण, मी राज्याच्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. तथापी, लक्ष्मण हाके यांनी ओबीसी कोट्यातील मराठा आरक्षणासाठी वकिली करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. (हेही वाचा -Maratha OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाकेंकडून प्राणांतिक उपोषणाची घोषणा; आंतरवाली सराटीतच करणार उपोषण)

लक्ष्मण हाके यांची महायुती सरकारमध्ये कॅबिनेट पदाची मागणी , पहा व्हिडिओ - 

लोक मनोज जरंगे यांना कंटाळले आहेत. त्यांनी दावा केला होता की, त्यांच्या आंदोलनाचा 130 जागांवर प्रभाव पडेल. परंतु ज्या उमेदवारांना त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला ते मोठ्या फरकाने निवडून आले, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.