Maharashtra School: आता शाळा एप्रिल अखेरपर्यंत राहणार सुरू, शालेय शिक्षण विभागाचा नवीन आदेश जारी
यावर्षी शाळा (School) एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या वर्षीची वार्षिक परीक्षा (Exam) एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल (Exam Result) मे महिन्यात जाहीर होतील.
पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Students) महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा (School) एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या वर्षीची वार्षिक परीक्षा (Exam) एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल (Exam Result) मे महिन्यात जाहीर होतील. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी हा आदेश जारी केला. गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्य कोरोनाच्या संकटात सापडले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
विशेष म्हणजे रविवारी विद्यार्थ्यांना दिलेली साप्ताहिक रजा आणि शनिवारी अर्धी रजाही रद्द करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना रविवारी वर्गात हजेरी लावायची आहे त्यांना तसे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण विभागाकडून गुरुवारी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. नवीन परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांचे वर्ग आता एप्रिल अखेरपर्यंत 100 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. साधारणपणे मार्च महिन्यात शाळा सकाळच्या सत्रातच विद्यार्थ्यांनी भरलेली असते. पण कोरोनाने आधीच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हेही वाचा BDD Chawl: बीडीडी चाळींना राजकीय नेत्यांची नावे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी यांचा समावेश; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सभागृहात माहिती
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. या कालावधीत 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शनिवार आणि रविवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. ज्या विद्यार्थ्यांना रविवारी शाळेत यायचे आहे, ते विद्यार्थीही रविवारी शाळेत येऊ शकतात, असे आदेशात म्हटले आहे. या वर्षी एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत. तसे आदेशही शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत.
या कालावधीत विद्यार्थ्यांचे उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा होणार आहेत. मे महिन्यात निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे.