Devendra Fadnavis On Notice: मी पर्दाफाश केलेल्या कटाचे उत्तर सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांना मिळत नसल्यामुळे मला नोटीस - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चुकीच्या पद्धतीनेही पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले असेल, तर मी चौकशीत सहकार्य करेन. माझे एवढेच म्हणणे आहे की, ही माहिती कशी बाहेर आली याची चौकशी करण्याऐवजी सहा महिन्यांपासून बदली-पोस्टिंगमधील दलालीबाबतचा अहवाल शासनाकडे पडून होता, त्यावर कारवाई का झाली नाही?
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मला नोटीस पाठवली आहे. मला उद्या सकाळी 11 वाजता BKC सायबर पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आहे. मी तिथे नक्कीच जाईन. मी काल पर्दाफाश केलेल्या कटाचे उत्तर राज्य सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांना मिळत नाही. म्हणूनच ही नोटीस मला CrPC 160 अंतर्गत पाठवण्यात आली आहे. मी उद्या सकाळी 11 वाजता बीकेसी सायबर पोलीस स्टेशनमध्ये (BKC Cyber Police Station) नक्कीच हजर राहीन. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे गटनेते आशिष शेलार उपस्थित होते .
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मार्च 2021 मध्ये मी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात मी महाविकास आघाडी सरकारच्या गृहखात्याने केलेला बदली-पोस्टिंग घोटाळा उघडकीस आणला होता. माझ्याकडे असलेले पुरावे सायंकाळपर्यंत केंद्रीय गृहसचिवांना सादर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने ते सीबीआयकडे सोपवले. सध्या सीबीआय या बदली-पोस्टिंग घोटाळ्याचा तपास करत आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तपासाचाही समावेश आहे. ते सध्या तुरुंगात आहेत.
ज्या वेळी सीबीआयने हा तपास सुरू केला, त्या वेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दडपण्यासाठी एफआयआर नोंदवला. एफआयआरमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, ऑफिशियल सीक्रेट अॅक्टशी संबंधित माहिती कशी लीक झाली? त्या एफआयआरबाबत मला उत्तर देण्यास सांगण्यात आले. मी तुम्हाला ही माहिती देईन असे उत्तर दिले. मात्र, विरोधी पक्षनेता असल्याने माझ्याकडे ही माहिती कोठून आली, असा प्रश्न विचारला जाऊ नये, हीच मला मुभा आहे. तरीही माझी जबाबदारी लक्षात घेऊन मी उद्या सकाळी पोलिसांसमोर हजर होणार आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चुकीच्या पद्धतीनेही पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले असेल, तर मी चौकशीत सहकार्य करेन. माझे एवढेच म्हणणे आहे की, ही माहिती कशी बाहेर आली याची चौकशी करण्याऐवजी सहा महिन्यांपासून बदली-पोस्टिंगमधील दलालीबाबतचा अहवाल शासनाकडे पडून होता, त्यावर कारवाई का झाली नाही? हेही वाचा Shivsena On BJP: मायावतींचा आदर्श देत शिवसेनेची सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका, लिहिले की, ...भाजपने हे लक्षात ठेवावे
त्या अहवालात कोणाकडून किती रक्कम कोणत्या जिल्ह्यात हस्तांतरित झाली याची सर्व माहिती होती. पैसे देऊन त्यांची पोस्टींग कोणत्या पोलीस ठाण्यात कोणी मिळवली? अशा परिस्थितीत घोटाळा उघड करणाऱ्यावर नव्हे तर सरकारवर कारवाई व्हायला हवी. सीबीआयच्या तपासात दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)