पालघर जवळील 'या' मतदान केंद्रावर शुकशुकाट; मतदानाचा एकूण आकडा 1 टक्क्याहून कमी

परंतु शहरी भागांत मात्र नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. आश्चर्याची बाब म्हणजे डहाणू जावळी वाढवण-वरोर या परिसरातील अनेकांनी मतदानास हजेरी न लावण्याचे ठरवले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीनिमित्त आज मतदान होत आहे. आज सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला नाली आहे. मतदानाचे आता काहीच तास बाकी असल्याने लोकांनी अनेक भागात मतदानावर बहिष्कार टाकल्याचेही दिसून येते.

ग्रामीण भागात बऱ्यापैकी लोक मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसले. परंतु शहरी भागांत मात्र नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. आश्चर्याची बाब म्हणजे डहाणू जावळी वाढवण-वरोर या परिसरातील अनेकांनी मतदानास हजेरी न लावण्याचे ठरवले आहे.

वाढवण-वरोर परिसरातील मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत या विभागात एकही टक्का मतदान झाले नव्हते.

पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण,वरोरच नाही तर डहाणू खाडी व जवळपासच्या इतर विभागातील जनतेकडून मतदानावर 100 टक्के बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही हात नाहीत तरी 'या' शेतकऱ्याने केले मतदान; पायावर लावून घेतली शाई (See Photo)

महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख मतदार आहेत व संपूर्ण राज्यात मतदानासाठी 96 हजार 661 मतदानकेंद्रांची सोय करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 % मतदान झाले आहे. मुंबईमध्ये मतदानाचा हा आकडा 35 टक्के तर पुण्यात 44 टक्के आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif