'मराठा आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना विठूरायाच्या शासकीय पूजेचा मानही नाही; सकल मराठा मोर्च्याने आक्रमक होत दिला इशारा!

त्यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) दिवशी शासकीय पूजेचा मान देवेंद्र फडणवीस की अजित पवार यांना मिळणार यावर प्रश्नचिन्ह आहे. राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नी आक्रमक असताना आता कार्तिकीला विठूरायाच्या शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकर्‍याच्या हस्ते करावी असे पत्र सकल मराठा मोर्च्याने मंदिर प्रशासनाला दिले आहे. आता कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना एन्ट्री न देण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चाने केला आहे. Kartiki Ekadashi 2023: विठ्ठला.. कोण करणार पूजा? अजित पवार की देवेंद्र फडणवीस? कार्तिकी एकादशी शासकीय पूजेवरुन मंदिर समितीपुढे पेच .

मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून पुन्हा मराठा आरक्षण प्रश्नी एल्गार सुरू केला आहे. त्यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय पंढरपूरात सकल मराठा समाजाने घेतला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते पूजा करा , आरक्षण न देता कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू असा इशारा समितीने दिला आहे.

सध्या राज्यभर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे, साखळी उपोषण सुरू आहे. संपूर्ण गावांनी उपोषणामध्ये सहभागी व्हावं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देऊ नका. तसेच उपोषणादरम्यान कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. सध्या आंदोलन सुरू असले तरीही कुणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

यंदा कार्तिकी एकादशी  23 नोव्हेंबर दिवशी आहे दरवर्षी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत एका सामान्य जोडप्याला एकत्र पणे विठ्ठल रूक्मिणीची पूजा करण्याचा मान दिला जातो. या शासकीय पूजेनंतर भाविकांना दर्शन खुलं केलं जातं.