महाशिवरात्र निमित्त मुंबई मध्ये आज Dry Day? पब आणि बार मध्ये सर्व्ह करणार अल्कोहल मात्र मद्य विक्रीची दुकानं राहणार बंद
शिवाची महान रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक भगवान शंकराची पूजा-प्रार्थना करतात. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व मोठे असले तरी आजचा दिवस ड्राय डे म्हणून पाळला जात नाही.
आज देशभरात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळेल. 'शिवाची महान रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक भगवान शंकराची पूजा-प्रार्थना करतात. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व मोठे असले तरी आजचा दिवस 'ड्राय डे' (Dry Day) म्हणून पाळला जात नाही. आजच्या दिवशी ड्राय डे नसल्यामुळे बार आणि पबमध्ये अल्कोहल सर्व्ह केले जाईल. मात्र मद्य आणि वाईन विक्रीची दुकाने बंद राहतील. परंतु, आजचा दिवस हा देशभरात 'ड्राय डे' म्हणून पाळला जाणार नाही. (Dry Days In Mumbai 2020: मकरसंक्रांती , होळी, गणेशोत्सव, एकादशी धरून यंदा वर्षभरात 26 ड्राय डे; पहा महिन्यानुसार पूर्ण यादी)
21 फेब्रुवारी म्हणजे आजच्या दिवशी शुक्रवार असल्याने सर्वांमध्ये विकेंडचा जोश आणि आनंद आहे. त्यातच जर ड्राय डे असेल तर विकेंडच्या उत्साहावर पाणी फिरु शकते. मात्र देशभरात ड्राय डे नसल्यामुळे मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. परंतु, अनेकदा काही धार्मिक सणांनिमित्त मद्याची दुकाने बंद ठेवण्यात येतात. तसंच काही धार्मिक आणि राष्ट्रीय सणांदिवशी भारत सरकारतर्फे ड्राय डे घोषित केला जातो. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी ड्राय डे असेल अशी जर तुमची समजूत झाली असेल तर असे अजिबात नाही. आजच्या दिवशी तुम्हाला हॉटेल्स, बार आणि पबमध्ये मद्यपान करता येईल.
आज ड्राय डे जरी नसला तरी महाशिवरात्रीचे महत्त्व, पावित्र्य मोठे आहे. आपल्या भारत देशात तर भगवान शंकराचे स्थान अत्यंत मानाचे आणि महत्त्वाचे आहे. महाशिवरात्रीचा उत्सव देशातील अगदी लहान-मोठ्या मंदिरांमध्येही अगदी जल्लोषात साजरा केला जातो. शिव मंदिरांची मोठ्या प्रमाणावर सजावट केली जाते. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते. दूध-पाणी, बेलपत्रं वाहून शिवाची पूजा केली जाते. तसंच या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.