Nitesh Rane Family Accident: मुंबई पुणे महामार्गावर भाजप आमदार नितेश राणेंच्या पत्नीच्या गाडीला ट्रकची धडक
या गाडीत भाजप आमदार नितेश राणे यांची पत्नी, मुले आणि नातेवाईक होते. मुंबईहून पुण्याला येत असताना हा अपघात झाला.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Express Way) उर्से टोल प्लाझा (Urse Toll Plaza) येथे काल सायंकाळी राणे कुटुंबीयांच्या (Rane Family) कारचा किरकोळ अपघात झाला. या गाडीत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची पत्नी, मुले आणि नातेवाईक होते. मुंबईहून (Mumbai) पुण्याला (Pune) येत असताना हा अपघात झाला. दरम्यान टोल बुथवर (Toll Booth) टोल भरण्यासाठी राणे कुटुंबीयांची गाडी रांगेत थांबली असताना टोल भरण्यासाठी मागे थांबलेल्या ट्रकने राणे कुटुंबीयांच्या गाडीला किंचित धडक दिली. कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. तरी याप्रकरणी पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांनी (Police) ट्रकचालकाला ताब्यात घेतले सुन पुढील चौकशी सुरु आहे.
हल्ली रस्ते अपघातांची संख्या देशभरात वाढली आहे. दोन दिवसापूर्वीचं उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं कार अपघातात निधन झालं. तसेच काही दिवसांपूर्वी मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai Pune Express Way) शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं देखील कार अपघाता (Car Accident) निधन झालं. बड्या लोकाच्या अपघाती निधनानंतर कार वाढते कार अपघात हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता यापाठोपाठ आमदार नितेश राणेंच्या (Nitesh Rane Wife) पत्नीच्या गाडीचा हा अपघात ही बाब जरा विचित्र आहे. अपघात किरकोळ असला तरी पिंपरी चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. (हे ही वाचा:- Cyrus Mistry यांच्यासोबत प्रवास करणार्या Dr Anahita Pandole आणि त्यांचे पती Darius Pandole यांना उपचारासाठी मुंबईच्या HN Reliance Foundation Hospital मध्ये हलवले)
सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. काल संध्याकाळी 5:30 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तरी गाडीला धडक देणारा हा ट्रक चालक (Truck Driver) कर्नाटकाचा (Karnataka) रहिवासी असुन पुढील बाबी चौकशीत पुढे येतील अशी माहिती पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांनी दिली आहे.