पहिले आमचे छत्रपती,मग जाऊन करा अयोध्येत आरती- नितेश राणे यांचा शिवसेनेला टोला

मात्र कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी आता शिवसेनेवर या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन टीका केली आहे.

नितेश राणे ( फोटो सौजन्य - ट्विटर )

मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या शिवाजी महाराजांना उन्हात उभे ठेवले आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभारेल असे शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे हे तिथीनुसार आलेल्या शिवजयंती वेळी म्हणाले होते.

मात्र कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी आता शिवसेनेवर विमानतळावरील  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन टीका केली आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेने शब्द देऊन ही महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारले नाही, तर अयोध्येत मंदिर काय उभारणार अशा शब्दात सुनावले आहे. तर आज नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षासोबत विमानतळाच्या येथे जाऊन शिवाजी महाराजांच्या डोक्यावर त्यांनी छत्र उभारले आहे. ( हेही वाचा - 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमणार आयोध्यानगरी; हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आयोध्येत दाखल )

तर शिवसेने पक्षनेते आजवर भगव्याचे राजकरण करत आले आहेत. या अयोध्येप्रकरणी ही उद्धव ठाकरे राजकरण करत आहे अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.