Nisarga Cyclone: मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा आणि मोठ्या लाटांना सुरुवात (Watch Video)
मुंबईत सकाळी 10:14 वाजता 4.26 मीटर उंच आणि रात्री 9:58 वाजता 4.08 मीटर उंच भरती येईल असेही हवामान खात्याने सांगितले होते. यानुसार आता मुंबईतील वर्सोवा (Versova Beach) समुद्र किनाऱ्यावरील दृश्य समोर येत आहेत.
निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone) आज, 3 जून रोजी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग (Alibaug) येथून जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तत्पूर्वी या वादळी वाऱ्यांमुळे मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात (Arabian Sea) भरती (Higtides) होईल. मुंबईत सकाळी 10:14 वाजता 4.26 मीटर उंच आणि रात्री 9:58 वाजता 4.08 मीटर उंच भरती येईल असेही हवामान खात्याने सांगितले होते. यानुसार आता मुंबईतील वर्सोवा (Versova Beach) समुद्र किनाऱ्यावरील दृश्य समोर येत आहेत. वर्सोवा येथे समुद्री मोठ्या लाटा किनाऱ्याला धडकायला सुरुवात झाली आहे, याभागात तुरळक पाऊस असून सध्या सोसाट्याचा वारा वाहत असल्याचे या व्हिडीओ मधून दिसत आहे. निसर्ग चक्रीवादळाचे क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
आज, दुपारच्या वेळेत मुंबई मध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशावेळी नागरिकांंनी बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. अगदी अत्यावश्यक कारण असल्यास बाहेर जाण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत मुंंबई महापालिकेच्या वतीने सुचनावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार स्वसंरक्षणासाठी काय करावे आणि काय करु नये हे जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.
ANI ट्विट
दरम्यान, मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. काही तासांत हे वादळ धडकत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी वादळासाठी प्रशासन सज्ज असून जवळपास एनडीआरएफच्या 20 टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले आहे.