Night Curfew in Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून रात्रीची जमावबंदी, रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान हॉटेल्स, मॉल्स, बगीचे, सिनेमागृहे राहणार बंद

या कालावधीत मुंबईतील मॉल्स (Malls), हॉटेल्स (Hotels), बगीचे (Gardens), सिनेमागृहे (Cinema Halls) देखील बंद राहतील.

Malls | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रात आजपासून ते 15 एप्रिलपर्यंत रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू (Night Curfew in Mahashtra) लागू करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येईल. या कर्फ्यूमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोक रात्री 8 ते सकाळी 7 वाजे दरम्यान एकत्र येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. या कालावधीत मुंबईतील मॉल्स (Malls), हॉटेल्स (Hotels), बगीचे (Gardens), सिनेमागृहे (Cinema Halls) देखील बंद राहतील.

2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची राज्यातील जिल्हाधिका-यांशी झालेल्या बैठकीत कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात आजपासून नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत ही जमावबंदी लागू असेल.हेदेखील वाचा- Uddhav Thackeray: होळी आणि धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला खास आवाहन

नाईट कर्फ्यू दरम्यान रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. उपाहारगृहे, सिनेमागृहे, सभागृह यांनी नियमभंग केल्यास त्यांना करोनाची साथ संपेपपर्यंत टाळे ठोकण्याचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हा, पालिका आणि पोलीस प्रशासनास दिले आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजार, व्यापार, व्यवहार बंद राहतील. घरात विलगीकरणात राहणाऱ्यांच्या हातावर शिक्का मारण्याबरोबरच दरवाजावर पाटी लावण्याच्या तसेच कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही घरातच सक्तीने राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

मुंबई परिसरात रेल्वे प्रवासावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिक रेल्वेतून प्रवास करू शकतील. तसेच जिल्ह्यातंर्गत किंवा आांतरजिल्हा प्रवासावरही कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. काही जिल्हाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली होती, परंतु सरकारने प्रवासावर कोणतेही निर्बंध लागू केलेले नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif