Mumbai Police Drink and Drive: न्यू ईयर सेलिब्रेशनवेळी मुंबई पोलिसांकडून 229 तळीरामांवर कारवाई
मुंबई पोलिसांनी ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत 229 जणांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर निमित्ताने112 ठिकाणी नाकेबंदी केली होती. तर, 2410 जणांवर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) घराबाहेर पडलेल्या 229 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाई केली आहे. नववर्षाच्या पुर्वसंध्येला ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह (Drink And Drive) करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठेही गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात वाढ झाली. (हेही वाचा - Navi Mumbai Traffic Congestion: पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा)
पाहा पोस्ट -
#WATCH | Maharashtra: Security tightened in the wake of New Year celebrations in Thane. Vehicles are being checked by the police. pic.twitter.com/jpIWfsKEer
— ANI (@ANI) December 31, 2023
मुंबई पोलिसांनी ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत 229 जणांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर निमित्ताने112 ठिकाणी नाकेबंदी केली होती. तर, 2410 जणांवर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्याशिवाय, विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या 320 आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या 80 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी बंदोबस्ता दरम्यान एकूण 9025 वाहने तपासण्यात आली.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयु्क्तालयाच्या वाहतूक पोलिसांकडून थर्टी फस्ट साजरी करताना, दारु पिवून गाडी चालवणा-या 104 तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरीक मोठ्या प्रमाणावर थर्टी फस्ट राञी जल्लोषात साजरी करत असतात.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2024 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

