Minor Girl Rape Case: शेजारच्याने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Minor Girl Rape Case: महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील टाऊनशिपमध्ये सात वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेनंतर कुटुंबियांना धक्काच बसला आहे. नवी मुंबईतील उलवे येथे ही घटना घडली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात पीडितेवर अत्याचार केले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी चार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. (हेही वाचा- नवी मुंबई मध्ये टॅक्सी ड्रायव्हरने लग्नाचा दबाव टाकणार्‍या प्रेयसीचा केला निर्घुण खून)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उलवे परिसरात एका इमारतीत ही घटना घडली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी शेजारी राहतात. पीडित सायंकाळी खेळण्यासाठी शेजारी गेली होती. त्यावेळीस आरोपीने वेळ साधून पीडितेवर अत्याचार केला. आरोपीने पीडितेचे फोटो देखील काढले आणि ही गोष्ट कोणाला सांगू नकोस अशी धमकी दिली. पीडित घाबरून घरी आली.

पीडितेने घरी येऊन ही घटना आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी घटनेची माहिती सागरी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार नोंंदवला. शनिवारी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर  भारतीय दंड संहिता कलम पोस्को कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.