Loksabha Election 2024: शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी
जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar Party) लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली. साताऱ्यातून Shashikant Shinde ,तर रावेरमधून Shreeram Patil यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी. शरद पवार गटाने 10 जागांपैकी 9 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. माढा बाबत अद्याप उमेदवार निश्चित नाही. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आलीय तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी देण्यात आली आहे. (हेही वाचा - Mahavikas Aghadi Press Conference: महाविकासआघाडीचे जागावाटप जाहीर; शिवसेना-UBT 21, NCP (शरद पवार) 10), Congress- 17 जागांवर लढणार)
पाहा पोस्ट -
महाविकास आघाडीनं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच आज शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे.
शरद पवार गटाकडून आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाला 10 जागा सुटल्या आहेत. अशातच 10 पैकी 9 जागांवर पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त माढ्याचा जागेचा तिढा कायम आहे. माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे.