Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला
त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र आणून एक बैठक घ्यावी असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला दिला आहे.
Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राजकाणातील चाणाक्य अशी ओळख असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी लक्ष घातले आहे. 'मराठा अरक्षणासाठी ओबीसी समाजात नाराजीचे सूर आहेत. त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र आणून एक बैठक घ्यावी असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला दिला आहे. दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे.' असेही त्यांनी सुटवले आहे.(हेही वाचा:Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका, विकासाच्या प्रश्नांबाबत काढला जातोय चर्चेतून मार्ग- Devendra Fadnavis )
प्रसार माध्यामांशी बोलाना शरद पवार यांनी म्हटले की, 'नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.. त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावावी. आम्हीही उपस्थित राहू, आमची भूमिका असेल. मला खात्री आहे की मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक बोलावतील. केंद्रात 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी या समस्येकडे सकारात्मक पाऊल उचलले तर आम्ही त्यांना सहकार्य करू.', असे शरद पवार म्हणाले.(हेही वाचा:Maratha Reservation: मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत 10% आरक्षण; विधेयक एकमताने मंजूर )
नुकतीच पुण्यात त्यांची पत्रकारपरिषद पार पडली. त्यात ते बोलत होते.'राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनावर नेत्यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलक आणि विरोधी पक्षांकडून होत आहे. राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडू नये यासाठी सर्व चितेत आहेत. राज्यात 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. यासाठी सर्वांनी मिळून केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडली पाहिजे. केंद्र सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका घेतल्यास त्याला आमचं समर्थन असेल', असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.