Bihar Assembly Election 2020: दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वत:चाच पाय अडकतो, भाजप अनुभव घेतोय- रोहित पवार
तसेच 'दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय', असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बिहार विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स (Bihar Assembly Elections Exit Polls) अंदाजावरुन विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित (BJP) एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्झिट पोलवरून दिसतंय, असं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे. तसेच 'दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय', असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी बिहार विधानसभा निवडणूक मतदान पूर्ण झाल्यावर आलेल्या एक्झिट पोल्स अंदाजावर भाष्य केले आहे. एक्झिट पोल्सनी दाखवलेल्या अंदाजाचा धागा पकडत रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ''बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा''. (हेही वाचा, Exit Poll Results of Bihar Assembly Elections 2020: बिहार निवडणूक निकालात CNN News18-Today's Chanakya च्या अंदाजानुसार महागठबंधन 180 तर NDA 55 जागा जिंकणार )
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमेक्रॅटीक पक्षाचे जो बिडेन विजयी झाले. योगायोग असा की प्रचारावेळी जो बिडेन सभा घेत असताना पाऊस आला. या पावसातही बिडेन यांनी आपले भाषण कायम ठेवले. दरम्यान, रोहीत पवार यांनी बिडेन यांच्या सभेवरुन भाजपला चिमटा काढला. पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, जेंव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेंव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. 2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे!.