राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा शिवबंधनात; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

आमदार बरोरा यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्का मानले जात आहे. आमदार बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही निवडूण आले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते एकमेव आदीवासी आमदार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा शिवबंधनात; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
NCP MLA Pandurang Barora join Shiv Sena | ( Photo Credits: Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार पांडुरंग बरोरा (NCP MLA Pandurang Barora) यांनी विधासभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज (10 जुलै 2019) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला. बरोरा यांनी कालच (मंगळवार, 09 जुलै 2019) विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. बरोरा यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्का मानले जात आहे. आमदार बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही निवडूण आले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते एकमेव आदीवासी आमदार होते.

आमदार पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. पवार काका-पुतणे आणि आमदार बरोरा यांचे संबंद हे गेल्या 40 वर्षांपासून सौहार्दाचे राहिले आहेत. त्यामुळे इतक्या घनिष्ठ नेत्याने पक्ष सोडणे हे धक्कादायक मानले जात आहे.

शिवसेना ट्विट

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाडा-शहापूर विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल झाले होते. त्यात आमदार बरोरा हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना पक्षात प्रवेश करणार असे बोलले जात होते. काही मेसेजमध्ये तर 'आमदार बरोरा आषाढी एकादशीला भगवी पताका हातात घेणार', असे संकेतदर्शक संदेश दिले जात होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2019 02:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).