Money Laundering Case: महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री ईडीच्या जाळ्यात; प्राजक्त तनपुरे यांची चौकशी
प्राजक्त तनपुरे यांच्या रुपात महाविकासआघाडी सरकारचा आणखी एक मत्री केद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यात अडकला आहे.
महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने चौकशी केली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या रुपात महाविकासआघाडी सरकारचा आणखी एक मत्री केद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यात अडकला आहे. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (Maharashtra State Co-op Bank) घोटाळ्याप्रकरणी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. आतापर्यंत महाविकासआघाडी सरकारमधील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर यांसारख्या अनेक मातब्बर नेत्यांची ईडीद्वारे चौकशी झाली आहे. ही प्रकरणे अद्यापही ईडीकडे प्रलंबीत आहेत. त्यात आता तनपुरे यांची भर पडली आहे.
महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेकडून काही साखर कारखान्यांनी कर्जे घेतली होती. यात अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना सुद्धा होता. या कारखान्याकडून बँकेच्या कर्जाची परतफेड झाली नाही. परिणामी कर्ज प्रकरणात बँकेने कारखाना जप्त केला. कारखान्याची जप्ती झाल्यानंतर सन 2012 मध्ये या कारखान्याचा लिलावही झाला. विशेष म्हणजे हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनीच विकत घेतला. सांगितले जाते की कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी रुपये होती. मात्र, तनपूरे यांनी आपल्या कंपनीद्वारे हा कारखाना 13 कोटी रुपयांना विकत घेतला. या व्यवहारावरच ईडीला संशयआहे. त्यावरुन ईडी तनपुरे यांची चौकशी करत आहे. ईडीने तनपुरे यांना चौकशीसाठी समन्स पाठवले. त्यानुसार तनपुरे चौकशीला हजर झाले. (हेही वाचा, Anil Deshmukh Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार सीताराम कुंटे यांचा ईडीने नोंदवला जबाब)
ट्विट
दरम्यान, या आधीही जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीवरुन वाद सुरु होता. या वादानंतर अर्जुन खोतकर यांच्या कारखान्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता तनपुरे यांच्या साखर कारखान्याचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, एकूण चौकशी आणि प्रकरणाबाबत तनपुरे यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.