मुंबई: नायर इस्पितळात त्रासाला कंटाळून रहिवाशी महिला डॉक्टरची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
नायर हॉस्पिटलच्या रहिवाशी, शिकाऊ डॉक्टर पायल तडवी हिने हॉस्टेल मध्ये बुधवारी रात्री फाशी घेतली होती.या घटनेनंतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून तिने जीव दिल्याचा आरोप केला जात आहे.
नायर हॉस्पिटल (Nair Hospital) मधील रहिवाशी, शिकाऊ डॉक्टर पायल तडवी (Payal Tadvi) हिने बुधवारी संध्याकाळी हॉस्टेल मध्ये फाशी घेत आत्महत्या केली होती. यासंदर्भात हॉस्पिटलच्या अन्य तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल या 26 वर्षीय पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणीला याच हॉस्पिटल मधील अन्य तीन महिला डॉक्टरांकडून तिच्या जाती वरून वारंवार बोलणी ऐकावी लागत होती. या त्रासाला कंटाळून पायलने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असणार असा आरोप पायलच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता . यानंतर आग्रीपाडा पोलिसांच्या तपासात डॉ,हेमा अहुजा, डॉ.भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडिलवाल या तीन महिला डॉक्टर व्हाटसप चॅटवरून पायलचे रॅगिंग करत असल्याचे समोर आले आहे.
नायर हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पायल ही मूळ जळगावची विद्यार्थिनी गायनॅकोलॉजि विषयातील दुसऱ्या वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घेत होती.तर पायल चे पती सलीम तडवी हे कूपर हॉस्पिटलमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. गेल्या वर्षभरापासून तीन महिला डॉक्टर पायलचा छळ करीत होत्या , या डॉक्टर आपण मागास जातीचे आहोत म्हणून खाण्यापिण्यावर, पतीला भेटण्यावर बंधन घालायच्या तसेच आपण पदवी शिक्षण पूर्ण करू नये अशी धमकी द्यायच्या असे पायलने आई वडील व पतीला सांगितले होते. इंस्टाग्राम पोल वर फॉलोअर्सनी दिलेला सल्ला ऐकून 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या
एएनआय ट्विट
बुधवारी संध्याकाळी तिने आपल्या रुममध्येच फास लावून घेतला, याबाबत माहिती मिळताच पोलिसांना बोलवण्यात आले, प्राथमिक तपासात पायलचा मृत्यू अपघाती आहे असे नोंदवण्यात आले होते मात्र पायलच्या कुटुंबीयांनी यांसाठी हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांना दोषी धरले आहे, डॉक्टरांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पायलला या तीन डॉक्टर सतत अपमानित करायच्या. याचे स्क्रीनशॉट कुटुंबीयांनी पोलिसांना दिले. तसेच तिच्या आईने जळगाव पोलिस अधीक्षकांकडे दहा मे रोजी एक अर्ज दिला होता.
पायलच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर हॉस्पिटलमधील तीन महिला डॉक्टरांवर आयपीसी कलम 306 (आत्महत्येला भाग पाडणे) , रॅगिंग विरोधी व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच अनुसूचित जातीवर आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी देखील दाखल करण्यात आली आहे.