COVID-19 मुळे मुंबईला भाजीपाला पुरवणारी नवी मुंबई बाजारपेठ उद्यापासून बंद, भाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता

याचा फटका मुंबईकरांना बसणार असून येत्या काही दिवसांत भाजीपाला महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) चे महाभयाण संकट संपूर्ण जगभरात ठाण मांडून बसला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र तरीही कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराला भाजीपुरवठा करणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईला होणारी भाज्यांची आवक उद्यापासून म्हणजेच 25 मार्चपासून ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याचा फटका मुंबईकरांना बसणार असून येत्या काही दिवसांत भाजीपाला महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात लोकांनी लॉकडाऊन कडे दुर्लक्ष केल्यामुळे नाईलाजास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करावी लागली. त्यामुळे अनेक मार्ग, रेल्वेसेवा, बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे वाहतूकदार भाजीपाला पोहोचवण्याचे काम नाकारत आहेत. म्हणून आज बाजारात उरलेला माल विकून नवी मुंबई बाजारपेठ 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येईल. यामुळे भाजीपाला महागण्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर; सांगली येथे एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण

त्याचबरोबर कोरोना व्हायरस प्रार्दुभाव टाळण्यासाठी ही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाजारपेठेत मुंबईतील अनेक भाजीविक्रेते हा माल खरेदी करण्यासाठी येतात. यावेळी येथे प्रचंड प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळते. गर्दीत कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याकारणाने

नवी मुंबई भाजीपाला संघाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जवळपास 3 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात भारतात आतापर्यंत 471 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतात अनेक राज्यात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयानेच दिली आहे. नवीन आकड्यांनुसार महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 97 वर पोहोचली असून आधीच्या संख्येनुसार आणखी 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif