Vashi Bridge Traffic: वाशी उड्डाण पुलावर दोन डंपरच्या धडकेने भीषण अपघात; मुंबई कडे येणार्या मार्गावर वाहतुकीची कोंडी
नवी मुंबई (Navi Mumbai) येथील वाशी (Vashi) खाडी उड्डाण पुलावर आज, 5 मार्च रोजी सकाळच्या सुमारास दोन डंपर मध्ये धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाल्याचे समजतेय, परिणामी मुंबईकडे येणार्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.
नवी मुंबई (Navi Mumbai) येथील वाशी (Vashi) खाडी उड्डाण पुलावर आज, 5 मार्च रोजी सकाळच्या सुमारास दोन डंपर मध्ये धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाल्याचे समजतेय, यामुळे सकाळपासूनच या उड्डाणपुलावरील मुंबई कडे येणाऱ्या तीन मार्गिकांपैकी दोन मार्ग हे बंद करण्यात आले आहेत, परिणामी या एका सुरु असणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. मागील साधारण दीड ते दोन तासांपासून या पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने ऐन सकाळी कामावर जाणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. दुसरीकडे या अपघातात, कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी कार च्या पुढील भागात डंपरची धडक बसल्याने दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. Mumbai Fire: जोगेश्वरी येथील गोदामाला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश
ABP या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, वाहतूक कोंडी होताच वाशी टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यावेळी पिवळ्या रांगेच्या पुढपर्यंत वाहने उभी होती, मात्र तरीही अपघात लक्षात न घेता टोल वसुली मात्र सुरु असल्याचे पाहायला मिळत होते.
पहा ट्वीट
दरम्यान, या अपघाताविषयी प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे तसेच कामावर जाण्याच्या वेळी झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी संतापात प्रतिक्रिया दिल्या आहे.