Navi Mumbai Murder Case: नवी मुंबई मध्ये टॅक्सी ड्रायव्हरने लग्नाचा दबाव टाकणार्‍या प्रेयसीचा केला निर्घुण खून; नागपाडा मधून अटक

पीडीतेचा कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह 25 एप्रिलच्या सकाळी एका पांघरूणामध्ये उरण, नवी मुंबईतील चिरनेर-खारपाडा बाजूला असलेल्या तळेखार येथील कोरड्या पडलेल्या खाडीत आढळला आहे.

Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नागपाडा (Nagpada) मध्ये 28 वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला 27 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी नवी पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून त्याला लग्न करण्यासाठी दबाब टाकला जात असल्याने त्याने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पीडीतेचा कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह 25 एप्रिलच्या सकाळी एका पांघरूणामध्ये उरण, नवी मुंबईतील चिरनेर-खारपाडा बाजूला असलेल्या तळेखार येथील कोरड्या पडलेल्या खाडीत आढळला आहे.

उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन करण्यात आले आणि कलम 302 (हत्या) सह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान, 18 एप्रिल रोजी मुंबईतील मानखुर्द पोलिस ठाण्यातून बेपत्ता झालेल्या महिलेची माहिती पोलिसांना मिळाली. उरणमध्ये सापडलेला मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याची पुष्टी झाली आहे. अधिक तपासात असे समोर आले की, महिलेचे टॅक्सी चालकावर प्रेम होते आणि ती त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, त्याला त्याने नकार दिला होता, त्यामुळे त्यांच्यात वाद झाला.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी संध्याकाळी त्या व्यक्तीने महिलेला मानखुर्द येथे भेटून तिला ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील खडवली येथे नेले. त्याने 19 एप्रिल रोजी पहाटे 1 च्या सुमारास तिची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात टाकला. आरोपीला शनिवारी अटक करून स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांनी त्याला 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.