Navi Mumbai Murder Case: नवी मुंबई च्या उरण मध्ये एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरूणीची हत्या करणारा दाऊद शेख अखेर पोलिसांच्या ताब्यात; कर्नाटकातून अटक

2018 मध्ये पहिल्यांदा त्याने तिला पाहिलं होतं. ती 15 वर्षांची असताना तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आला होता

Forest, Murder (Photo Credit - pixabay.com)

नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एका तरूणीचा एकतर्फी प्रेमामधून जीव गेल्याचा प्रकार समोर आला आहे. तुरूंगातून सुटल्यानंतर प्रियकर दाऊद शेख  (Dawood Shaikh)  याने मुलीला ठार केल्याचं समोर आलं आहे. आरोपी दाऊदला पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे. तरूणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये सापडला आहे. मृत तरूणी उरण मधील रहिवासी होती. मैत्रिणीकडे जाते सांगून घराबाहेर पडलेली ही तरूणी 25 जुलै पासून बेपत्ता होती तर 27 जुलैला तिचा मृतदेह उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये सापडला.

आरोपी दाऊद शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटक मधून ताब्यात घेतले आहे. दरम्यान तरूणीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद फरार होता. नवी मुंबई पोलिसांची 7 पथकं त्याच्या मागावर होती. 4 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना दाऊदला बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. तो सातत्याने लोकेशन बदलत होत. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला कर्नाटक मधून ताब्यात घेतले आहे. Mumbai ‘Spa’ Murder Case: चुलबुल पांडे यांच्या हत्या प्रकरणी एकाला अटक, वरळीतील घटना .

मृत तरूणी सोबत आरोपी दाऊदचे जुने संबंध होते. 2018 मध्ये पहिल्यांदा त्याने तिला पाहिलं होतं. ती 15 वर्षांची असताना तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आला होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याची रवानगी तुरूंगात झाली होती. नुकताच तो जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तिच्या संंपर्कात आला होता. सीसीटीव्हीतून समोर आलेल्या फुटेमध्ये हत्या झाली त्या दिवशी यशश्री शिंदे हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत होती. तिच्या पाठोपाठ अवघ्या 10 मिनिटांतच दाऊद शेख जाताना दिसला होता.

मृत तरूणी 22 वर्षांची होती. तिच्यावर निर्दयीपणे वार करण्यात आले आहे. तरूणीच्या कंबरेवर,पाठीवर हल्ल्याच्या खुणा आहेत. दरम्यान तिच्यावर बलात्कार झाला होता का? याचा तपास सुरू आहे. झाडाझुडपात फेकलेल्या मृतदेहाचे लचके तोडण्यात आले होते. त्यामुळे तिचे कपडे आणि अंगावरील टॅटूच्या आधारे तिचा शोध घेण्यात आला.