Navratri Utsav 2023: राज्यात मराठी आणि गुजराती वाद पुन्हा पेटला, नवी मुंबईतील फलकानंतर मनसे आक्रमक

नवी मुंबई कामोठे येथे पटेल समाजाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश नसल्याचे फलक पाहून मनसे पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवत आयोजकांची भेट घेतली.

Navratri Utsav 2023: राज्यात मराठी आणि गुजराती वाद पुन्हा पेटला, नवी मुंबईतील फलकानंतर मनसे आक्रमक

राज्यात मराठी आणि गुजराती वाद अद्यापही शांत झालेला नाहीये. मुलुंड येथील गुजराती सोसायटीमध्ये मराठी उद्योजकांना जागा नाकारल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एकदा नवी मुंबई (Navi Mumbai News) या ठिकाणी संतापजनक घटना घडली आहे. नवी मुंबईच्या कामोठे येथे नवरात्रीत निमित्त आयोजित कार्यक्रमात पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आलाय. पटेल समाजाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश नसल्याचे फलक पाहून मनसेने (MNS) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा हाती घेतलाय. (Mumbai International Airport आज 6 तास देखभाल, डागडुजीच्या कामांसाठी राहणार बंद)

पाहा पोस्ट -

नवी मुंबई कामोठे येथे पटेल समाजाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश नसल्याचे फलक पाहून मनसे पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवत आयोजकांची भेट घेतली. यानंतर आयोजकांनी तातडीने आपला फलक हटवून सर्वांना परवानगी असल्याचा फलक लावला जाणार असल्याचं म्हटलं. तसेच आयोजकांनी सर्वांची माफीही मागितली.

राज्यात सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना मराठी आणि गुजराती वाद काही ठिकाणी होताना दिसतो आहे. काही दिवसापुर्वी घाटकोपर आणि मालाडमध्ये गुजराती फलकावरुन वाद झाला होता. मात्र इथेही मनसेने स्वत: उपस्थित राहून वाद मिटवलाय. तसेच आयोजकांना समज देखील दिला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).