नवी मुंबई: गणेश नाईक यांना मोठा धक्का; मुद्रीका गवळी, सुरेश कुलकर्णी, यांच्यासह 4 भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबई (Navi Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडून महापालिकेतील 49 नगरसेवकांसह भाजपमध्ये ( BJP) प्रवेश करणार्या आमदार गणेश नाईकांना (Ganesh Naik) पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे.
नवी मुंबई (Navi Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडून महापालिकेतील 49 नगरसेवकांसह भाजपमध्ये ( BJP) प्रवेश करणार्या आमदार गणेश नाईकांना (Ganesh Naik) पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. मुद्रीका गवळी (Mudrika Gawali), सुरेश कुलकर्णी (Suresh Kulkarni), राधा कुलकर्णी (Radha Kulkarni) यांच्यासह एका नगरसेवकाने आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार होते अशी माहिती प्रसारमाध्यमांत झळकत होती. अखेर आज चारही नगरसेवकांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षासमोर मोठी समस्या निर्माण झाल्याचे समजत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली कंबर कसली असून नवी मुंबईतल्या वर्चस्वाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने भाजप नगरसेवकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळवूनही भाजप सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपची नामुष्की होत आहे. महाराष्ट्रात सत्ता गमवल्यानंतर भाजपची घसरण सुरु झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत तळ ठोकला असून नवी मुंबईतल्या वर्चस्वाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने भाजप नगरसेवकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यातच गणेश नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी यांनी 4 नगरसेवकांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला पुन्हा एकदा जोरदार धक्का लागल्याचे कळते आहे. नगरसेवकांच्या या निर्णयावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक; CAA, NPR, एल्गारच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता
नवी मुंबई महापालिकेच्या एकूण 111 आहेत. नवी मुंबई येथील महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 56, शिवसेनेला 38, राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 10 तर, इतरला 5 जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाआधी राष्ट्रवादीकडे 52 नगरसेवक होते. मात्र, नाईकांनी 49 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत भाजपचे वर्चस्व निर्माण झाले होते.