Navi Mumbai Crime: नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची कार्यलयात घुसून हत्या, पोलिसांत गुन्हा दाखल
नवी मुंबईत एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी मुंबईत एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील उलवे भागाती ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. बांधकाम व्यावसायिकाचे मनोज सिंह असं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील उलवे परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची सीवूड सेक्टर ४४ मधील त्याच्या कार्यालयात घूसून अज्ञांतानी गोळी घालून हत्या केली. कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुलींनी प्रवेश केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शनिवारी १३ जानेवारी २०२४ सकाळी ११ वाजता ही घटना समोर आली. मारेकरूंनी डोक्यात गोळी झाडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञांताविरुध्दा गुन्हा दाखल केला आहे. मनोज सिंह यांच्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि, घटनास्थळी तपासणी केली. एखाद्या जवळच्या व्यक्तीने बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. परिसरात देखील पोलिसांनी चौकशी करत आहे. मनोज सिंग यांचा या आधी फसवणुक केल्याचा ही गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली