Navi Mumbai Crime News: नोकरीची ऑफर देत महिलेवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल, रबाळा येथील घटना

शिक्षकासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर रोडलगतच्या एका हॉटेलमध्ये शिक्षिकेचा विनयभंग आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी कोचिंग क्लासच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. हितेश शहा (४७) असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील बोरिवलीचा रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. महिलेने तिच्या तक्रारीत दावा केला आहे की आरोपीने तिला त्याच्या कोचिंग क्लासमध्ये नोकरी आणि 50 टक्के भागीदारीची ऑफर दिली होती.

त्याने पीडितेला रबाळे येथील हॉटेलमध्ये बोलावले

 आरोपीने शुक्रवारी संध्याकाळी पीडित महिलेला रबाळे येथील हॉटेलमध्ये आपल्या वर्गाचा अर्ज दाखविण्याच्या बहाण्याने बोलावले आणि त्याने तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले आणि तिचा विनयभंग केला. तीचा मानसिक छळ देखील केला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ (अनैसर्गिक गुन्हे) आणि ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) नुसार गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपीला पोलीस ताब्यात घेतील अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.