Navi Mumbai: मदत केली अंगाशी आली; वाशी येथे लॉकडाऊन काळात बेघर मुलाला दिला आधार, अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून 'तो' झाला पसार

या दरम्यान अशा लोकांच्या मदतीला शेकडो हात पुढे सरसावले होते. मात्र कधी कधी आपली ही मदत आपल्यालाच एका नव्या संकटामध्ये टाकू शकते.

Gold | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सध्याच्या कोरोना विषाणू (Coronavirus) काळात अनेकांना आर्थिक समस्येचा किंवा इतरही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. या दरम्यान अशा लोकांच्या मदतीला शेकडो हात पुढे सरसावले होते. मात्र कधी कधी आपली ही मदत आपल्यालाच एका नव्या संकटामध्ये टाकू शकते. अशीच एक घटना नवी मुंबईच्या वाशी (Vashi) परिसरामध्ये घडली आहे. लॉक डाऊनच्या काळात वाशी येथील एका जोडप्याने एका 17 वर्षाच्या बेघर मुलाला (Homeless Boy) आपल्या घरामध्ये आश्रय दिला होता. मात्र आता त्या मुलाने या घरातून तब्बल अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले आहे.

पोलिसांच्या तपासणीदरम्यान हा मुलगा जोगेश्वरीमध्ये सापडला असून, त्याच्याकडून सर्व दागिने हस्तगत केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्या जोडप्याने या मुलाला आपल्या घरी राहण्यास जागा दिली होती, त्यांना तो 14 सप्टेंबर रोजी सापडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार, वाशीतील सेक्टर 16 मध्ये कॅन्टिनचा व्यवसाय करणारे प्रकाश भागवत (39) यांनी लॉक डाऊनमध्ये सहानुभूती दाखवत या अल्पवयीन मुलाला आपल्या घरी आश्रय दिला होता. कालांतराने त्या मुलाने भागवत यांना त्यांच्या कॅन्टीन व्यवसायात मदत करत त्यांचा विश्वास प्राप्त केला.

27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9.30 च्या सुमारास, हा मुलगा चहा पिण्याच्या बहाण्याने घरी गेला. मात्र, तो कॅन्टीनमध्ये परतला नाही. कुटुंबीयांनी चौकशी केली असता त्यांना तो सापडला नाही आणि घरातील सोन्याचे दागिने व 700 रुपयांची रोकड असलेली बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब आयपीसीच्या कलम 381 अन्वये वाशी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविला. मुलाला ठेऊन घेताना भागवत यांनी पोलीस व्हेरिफिकेशन केले नव्हते त्यामुळे मुलाचा शोध घेणे अवघड झाले होते.

कधी कधी या मुलाचा चुलतभाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी भागवत यांना कॉल करत असे. पोलिसांनी या चुलतभावाच्या सेलफोनचा मागोवा घेत या मुलाला शोधून काढले. जोगेश्वरी पूर्वे येथील सुभाष नगरातील मेरीभाऊ चाळ इथे हा मुलगा सापडला. या मुलाकडून सर्व दागिने हस्तगत केल्यानंतर या मुलाला बुधवारी भिवंडी कोर्टात बाल समितीसमोर हजर करण्यात आले. नंतर त्याला सुधार केंद्रात पाठविण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif