नवी मुंबई: 15 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या महापालिका शाळेच्या शिक्षकाला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

नवी मुंबई (Navi Mumbai) महानगर पालिकेच्या एका शाळेत संगणक प्रशिक्षकाकडून तब्बल 15 मुलींचे लैंगिक शोषण केले जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, या शिक्षकाला आता 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आयपीसी (IPC) आणि पॉक्सो (POCSO) कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

jail | (Photo credit: archived, edited, representative image)

नवी मुंबई (Navi Mumbai) महानगर पालिकेच्या एका शाळेत संगणक प्रशिक्षकाकडून तब्बल 15 मुलींचे लैंगिक शोषण केले जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, या शिक्षकाला आता 2  मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आयपीसी (IPC)  आणि पॉक्सो (POCSO) कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित विद्यार्थींनी इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या आहेत. दोन महिन्यांपासून आरोपी पीडित विद्यार्थीनींचा विनयभंग करत होता. याबाबत शाळेला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली ज्यावरून शिक्षकाला अटक करण्यात आली होती आज या प्रकरणी सुणवणी घेऊन ही कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, विद्यार्थींनीनी सुरुवातीला या बाबत कुठेही बोलणे टाळले होते, तशी त्यांनी धमकीच देण्यात आली होती मात्र, हा प्रकार रोज रोज अधिकच वाढू लागल्याने अखेरीस विद्यार्थिनींनी याबाबत वर्गशिक्षकाकडे वाच्यता केली. दरम्यान, संबंधित शिक्षक हा गेस्ट लेक्चरर असून अन्य शाळांमध्ये सुद्धा संगणकांचे वर्ग घेत होता, त्याठिकाणी सुद्धा त्याने अशा प्रकारचे वर्तणूक केली आहे का असाही तपास केला जातोय. धक्कादायक! नवी मुंबई येथील पालिकेच्या शाळेत 14 विद्यार्थीनींचा विनयभंग; शिक्षकाला अटक

ANI ट्वीट

दरम्यान, 2 मार्च नंतर या शिक्षकाला सोडून देण्याऐवजी कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, महिला सुरक्षेचा गंभीर प्रश सध्या समोर असताना शाळेसारख्या ठिकाणी सुद्धा मुली सुरक्षित नसतील तर ही लज्जास्पद आणि चिंताजनक बाब आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी मांडल्या आहेत.