मुंबई: चुनाभट्टी पोलिस स्टेशन बाहेर Hand Washing Machine ची सोय; COVID 19 संकटात पोलिसांसाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचा स्त्युत्य उपक्रम

विशेष या मशिनचा नळ बंद करण्यासाठी माणसाची गरज भासत नाही.

Hand Washing Machine at Chunabhatti Police Station (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरबदारी सह अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. कोविड 19 च्या संकट काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे पोलिसांनाही कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेसाठी मुंबई मधील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेने (National Skill Training Institute) चुनाभट्टी पोलिस स्टेशन (Chunabhatti Police Station) बाहेर हात धुण्याचे मशिन लावले आहे. विशेष या मशिनचा नळ बंद करण्यासाठी माणसाची गरज भासत नाही.

राज्यातील विविध भागातील 23-25 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वाढता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी सॅनिटेशन व्हॅनची सोय करण्यात आली आहे. तर सॅनिटेशन टेन्टची उभारणी करण्यात आली आहे. (धारावी पोलिस स्टेशन बाहेर खासदार राहुल शेवाळे यांनी उभारली Sanitization Tent)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळणे अत्यंत आवश्यक आहे. वारंवार हात धुणे, मास्क घालणे हा त्यातील महत्त्वाचा भाग. त्यामुळे सतत बाहेर राहण्याऱ्या पोलिस वर्गासाठी NSTI ने केलेली ही सोय अत्यंत फायदेशीर आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 6817 वर पोहचला असून 5676 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.