नाशिक: चांदवड येथे वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासींचा हल्ला; वाहनं जाळली

पानी फाऊंडेशन अंतर्गत श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांवर आदिवासी जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिक मधील चांदवड येथून समोर आली आहे.

Shramdan | Representational Image | (Photo Credits: Twitter)

पानी फाऊंडेशन (Paani Foundation) अंतर्गत श्रमदान (ShramDan) करणाऱ्या गावकऱ्यांवर आदिवासी जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिक (Nashik) मधील चांदवड (Chandwad) येथून समोर आली आहे. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुष्काळावर मात करण्यासाठी पानी फाऊंडेशन गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या उपक्रमाअंतर्गत अनेकजण श्रमदानात सहभागी होतात. चांदवड तालुक्यातील 72 गावांनी सहभाग घेतला होता. मात्र श्रमदान सुरु असताना अचानक आदिवासी जमावाने गावकऱ्यांवर काठ्या आणि दगडाने हल्ला केला. यात चार जण जखमी झाले आहेत. इतकंच नाही तर आदिवासींनी बाईक्स जाळण्याचा प्रयत्नही केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र आदिवासींनी केलेल्या या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif