Naresh Goyal यांनी कॅन्सरच्या उपचारांचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला दाखल

आर्थिक गैरव्यवहाराचे त्यांच्यावर आरोप आहेत.

naresh Goel | File Photo

Jet Airways चे संस्थापक Naresh Goyal यांना आर्थिक घोटाळ्यामध्ये अटक केल्यानंतर आता त्यांनी Treatment of Malignancy म्हणजेच शरीरात वाढणार्‍या कॅन्सरच्या उपचारांसाठी (Cancer Treatment) जामीन द्यावा अशी मागणी केली आहे. स्पेशल कोर्टासमोर त्यांनी ही मागणी केली आहे. खाजगी डॉक्टरांकडे केलेल्या चाचणी मध्ये त्यांना कॅन्सरचा त्रास असल्याचं निष्पन्न झाल्याचं समोर आलं आहे.

कोर्टाने एक ऑर्डर पास करत त्यामध्ये मेडिकल बोर्ड स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याद्वारा नरेश गोयल यांची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्याचा अहवाल दिला जाईल. सध्या ईडी ने देखील अंतरिम जामीनासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मागितला आहे. नक्की वाचा:  Jet Airways Founder Naresh Goyal यांचा PMLA Court मध्ये जामिनीवरील सुनावणी दरम्यान 'जगण्याची आशा संपलीय...' म्हणत भावनांवरील बांध सुटला .

Prevention of Money Laundering Act मध्ये मागील महिन्यात स्पेशल जज एम जी देशपांडे यांच्याकडून नरेश गोयल यांच्यावर खाजगी डॉक्टरांकडून तपासणीसाठी परवानगी देण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये कॅन्सर वाढत असल्याचं समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. नरेश यांच्या आतड्यांमध्ये लहान ट्युमर वाढत असल्याचं ते म्हणाले आहेत. हर्नियाचा देखील त्रास असल्याचं समोर आलं आहे.

74 वर्षीय नरेश गोयल यांना ईडी कडून सप्टेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे त्यांच्यावर आरोप आहेत. कॅनरा बँकेने जेट एअरवेजला दिलेले ₹ 538.62 कोटींचे कर्ज बुडवल्याचे आरोप आहेत.