नालासोपारा येथे महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहासोबत Sex करणाऱ्या दुकानदाराला अटक

या दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

नालासोपारा (Nalasopara) येथे एका दुकानदाराने आपल्याकडे आलेल्या महिला ग्राहकाचा खून (Murder) करून नंतर तिच्याच मृत शरीरासोबत सेक्स (Sex)  केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सदर महिला ही 26 जून रोजी काही वाणसामान आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. जेव्हा अनेक तास उलटूनही ही महिला घरी परतली नाही तेव्हा तिच्या पतीने तुलिंग पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार नोंदवली. या महिलेचा पती हा याच भागात दुध विक्रेता म्हणून काम करतो. घृणास्पद! जमिनीत पुरलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून 50 वर्षीय नराधमाने शरीरसंबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, आरोपी गजाआड

पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनुसार तपास सुरु करताच सर्वात आधी त्यांनी त्या भागातील CCTV कॅमेरा तपासून पाहिले. यावेळी एका कॅमेरा मध्ये ही महिला खेळण्यांच्या दुकानात प्रवेश करताना पाहायला मिळाली होती. या दुकानदाराशी महिलेचे खेळण्यांच्या भावावरून भांडण सुरु असलेले सुद्धा या कॅमेऱ्यात स्पॉट झाले होते. महिला आणि दुकानदाराचे भांडण वाढत गेल्याने दुकानदाराने तिला केसापासून ओढत दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊन मध्ये नेले आणि तिथे तिचा गेला चिरून खून केला. इतक्यावरच न थांबता त्याने ती मेल्याचे खात्री होताच त्याच अवस्थेत तिच्या मृत शरीराशी सेक्स केला.

दरम्यान, हा सगळा प्रकार संपताच त्याने रस्त्यालगत असणाऱ्या एका व्हॅन मधून या महिलेचा मृतदेह टाकून नेतानाही पाहायला मिळाले आहे. या भागातील लोकांनी सतत कळसा तरी वास येत असल्याची तक्रार केल्यावर अखेरीस त्या दुकानात पडलेल्या रक्ताचा शोध लागला आणि एकूण प्रकरणाचा उलगडा झाला. या दुकानदारावर गुन्हा दाखल करून सध्या त्याला कोठडीत ठेवण्यात आले आहे.