IPL Auction 2025 Live

Nagpur Rain Updates: नागपूरमध्ये एका रात्रीत 100-125 मिमी संततधार पाऊस, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Watch Video)

विपीन इटनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रात्रीत तब्बल 100 ते 125 मिमी पाऊस पडला आहे. सकल भागात पाणी साचल्याने अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले. त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले. नागरिकांना मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात ठेवल्या आहेत.

Nagpur Rain | (Photo Credits: X)

Nagpur Rain Video: नागपूरला पावसाने झोडपून (Nagpur Rain Updates) काढले आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. पार्किंग परिसरातही पाणी घुसल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रात्रीत तब्बल 100 ते 125 मिमी पाऊस पडला आहे. सकल भागात पाणी साचल्याने अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले. त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले. नागरिकांना मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात ठेवल्या आहेत. आतापर्यंत या तुकड्यांनी जवळपास 200 ते 300 नागरिकांना सुरक्षीतपणे पाण्यातून बाहेर काढले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने  नागपूर जिल्ह्याला आजही मूसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर सकल भागात राहणाऱ्या नागरिकांनी उंच आणि सुरक्षीत ठिकाणी जाण्याचेही अवाहन करण्यात आले आहे. शहरातील अनेक वाहने पाण्याखाली गेली आहेत.

व्हिडिओ

सुरक्षेचा उपाय आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा आणि महानगर क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे. दुसऱ्या बाजूला नागनदीला पूर आला आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. खास करुन संजीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटितील रहिवाशांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्याचे पाहायला मिळते. काही घराच्या फाटकाच्या भिंती कोसळल्या, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पुराचे पाणी घुसल्यानेही वेगळ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत.

ट्विट

व्हिडिओ

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. एक्सच्या माध्यमातून त्यांनी म्हटले आहे की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.