नागरपूरचे मेट्रो स्टेशन सजणार भव्यदिव्य अशा शिल्पाकृतींनी, पाह काय होणार विशेष बदल
नागपूर मेट्रो रेल्वे स्थानकांवर भव्य अशा शिल्पाकृती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूरवासियांची बहुप्रतिक्षित अशी मेट्रो रेल्वे 8 मार्च 2019 पासून सुरु झाली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारा नागपूर मेट्रोला(Nagpur Metro) हिरवा कंदिल दाखवला. चिचभवन ते बर्डीपर्यंत मेट्रो सेवा एकदम सुरळीत चालून असून येथील इतर मार्गांवरील मेट्रोचे काम सुद्धा झपाट्याने सुरु आहे. नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपुर्ण पाऊल मानले जात आहे. आणि आता त्यात भर म्हणून या मेट्रो रेल्वे स्थानकांवर(Metro stations) भव्य अशा शिल्पाकृती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर मेट्रो स्टेशनला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेशन बनवण्यासाठी येथील प्रशासन प्रयत्नशील आहे. नागपूरकरांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या उद्देशाने मेट्रो स्टेशनवरील भिंतींवर भव्य अशा शिल्पाकृती आणि वारली पेटिंग रेखाटण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे माजी संचालक पीयूष कुमार यांनी देशभरातील शिल्पकारांची कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत अशा दगडात कोरलेल्या भव्य व देखण्या अशा सुमारे ३५ शिल्पाकृती कलाकारांनी तयार केल्या होत्या. त्यातील 15 शिल्पाकृती मेट्रो स्टेशनच्या सजावटीसाठी केंद्राकडे मागितल्या होत्या. तसा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्राच्या कार्यकारी मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच ह्या कलाकृती आपल्याला नागपूर मेट्रो रेल्वे स्टेशनर पाहायला मिळतील, असे म्हणायला हरकत नाही.
Nagpur Metro ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिरवा कंदील, 8 मार्चला मोफत प्रवासाची मुभा
नागपूर मेट्रो ही केवळ चार वर्षात प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. या प्रोजेक्टसाठी सुमारे 8680 करोड रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.