Nagpur Crime: नागपूर येथे आयटी कर्मचाऱ्याकडून वरिष्ठांची हत्या, कामाच्या कामगिरीच्या वादातून कृत्य

त्याच्यावर कंपनीतील आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Work Performance Dispute: आयटी कंपनीमध्ये (Nagpur IT Company) काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. त्याच्यावर कंपनीतील आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. धक्कादायक म्हणजे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी कामगिरीवर भाष्य केल्याने आणि नाराजी व्यक्त केल्याने आपण ही हत्या केल्याचे आरोपीने म्हटले आहे. कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एल देवनाथन एनआर लक्ष्मीनरसिम्हन (21) असे पीडिताचे नाव आहे.

मद्यप्राशन केल्यानंतर हत्या

नागपूर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एल देवनाथन एनआर लक्ष्मीनरसिम्हन हा नागपूर येथील मिहान (मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ) येथे हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून जवळपास दहा महिन्यांपासून काम करत होता. चंदेल आणि पवन अनिल गुप्ता (हलवाई) हे त्याचे सहकारी होते. आरोपी आणि पीडित हे घटना घडण्यापूर्वी पीडिताच्या म्हणजेच एल देवनाथन याच्या घरी जमले होते. तेथे त्यांनी अतिप्रमाणावर मद्यप्राशन केले. नंतर त्यांच्यात वाद झाला आणि आरोपींनी लक्ष्मीनरसिह्मन याची हत्या केली. (हेही वाचा, Nagpur Crime: नागपूरात फोटोग्राफरची भरदिवसा घरात घुसून गोळ्या झाडून हत्या)

कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामगिरीवर भाष्य

पोलीस चौकशीदरम्यान, चंदेलने कबूल केले की देवनाथनने त्याच्या कामाच्या कार्यक्षमतेवर टीका केली होती.  कामगिरीमध्ये सुधारणा कशी व्हायला हवी हेही त्याने सांगितले. तो सातत्याने कामातील चुका काढत होता. दुरुस्त करत होता. त्यामुळे आपण पाठिमागील काही दिवसांपासून सातत्याने नाराज होतो. त्यामुळे मद्यसेवन केल्यानंतर त्याने रागाच्या भरात देवनाथनच्या छातीत धारधार चाकुने प्राणघातक वार केले. ज्यामुळे त्याच्या छातीत खोलवर छोद गेला, असेही आरोपी चंदेलने पोलिसांना सांगितले. सातत्याने होत असलेल्या वरिष्ठांच्या टीकेमुळे आपण तणावात होतो, असेही तो म्हणाला. (हेही वाचा, Nagpur Police: नागपूरमध्येही पोलिसांकडून गुन्हेगारांची परेड, गुन्हेगारांना सज्जड दम)

मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने आणि वेळीच कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न मिळाल्याने पुढे देवनाथन याचा मत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. धक्कादायक म्हणजे घडलेल्या घटनेबाबत चंदेल आणि त्याच्या सहकाऱ्याने घडलेल्या घटनेची कोठेही वाच्यता केली नाही. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या देवनाथन याला घरातच रात्रभर ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांनी डॉक्टरांना सांगितले की, तो बाथरुममध्ये पडला आणि जखमी झाला आहे. मात्र, पीडिताच्या अंगावर चाकुच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौकशी सुरु केली असता त्याच्या सहकारी चंदेल यानेच त्याची हत्या केल्याचे पुढे आले. पोलिस तपासात आरोपी चंदेल याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.