नागपूर: किंग्ज वे रोडवरील संचेती रुग्णालयास भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
नागपूर (Nagpur) येथील किंग्ज रस्त्यावरील (Kingsway Road) संचेती रुग्णालय (Sancheti Hospital in Nagpur) भीषण आगीने वेढले आहे. या आगीत सुमारे 20 जण आडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, बचत आणि मदतकार्य सुरु झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत आहे.
आगीचे कारण अद्या स्पष्ठ झाले नाही. मात्र, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. संपूर्ण इमारत ही काचेची असल्याने आग आटोक्यात आणताना आडथळे निर्माण होत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णालयातील रुग्णांना रुग्णालयाबाहे काढले आहे.
दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 3 महिला आणि 2 पुरुष कामगारांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण काय हे शोधले जाईल. तसेच, या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.