Nagpur Building Collapse: नागपूर मध्ये सदर परिसरात इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, 4 जणांची सुखरूप सुटका

तर दुर्देवाने एकाचा मृत्यू झाला आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

नागपूर मध्ये सदर  परिसरामध्ये ( Sadar Azad Chowk) आज (24ऑगस्ट) एक दुर्घटना घडली आहे. दरम्यान जीर्ण झालेल्या एका इमारतीचा भाग कोसळला आहे. यामध्ये एका कुटुंबातील चार जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तर दुर्देवाने एका 43 वर्षीय  व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 5 च्या सुमारास घडली आहे. इमारतीचा भाग कोसळल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दल, रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहचल्या आहेत.

जीर्ण इमारत कोसळल्याने मलबा हटवण्याचं काम सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे. दरम्यान सध्या या परिसरात पाऊस बरसत नसल्याने कामाला वेग असून तात्काळ दुर्घटनाग्रस्तांना नजिकच्या रूग्णालयात पोहचवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान ही इमारत 50 वर्ष जूनी होती.

मुंबईमध्ये देखील मागील महिन्याभरात झालेल्या जोरदार पावसामुळे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना पहायला मिळाल्या आहेत. यामध्ये दक्षिण मुंबई, वांद्रे,मालाड परिसरात इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.