नागपूर: बाईकवरुन आलेल्या दोन व्यक्तींकडून कॉलेजला जाणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

महाराष्ट्रातील गोंदिया मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर कॉलेजला जात असताना बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींकडून अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील गोंदिया मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर कॉलेजला जात असताना बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींकडून अ‍ॅसिड  हल्ला करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तरुणी नागपूर येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी आहे. पीडितेवर अॅसिड हल्ला झाला त्यावेळी ती कॉलेजला जाण्याल निघाली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची अधिक माहिती देत असे स्पष्ट केले आहे की, पीडिता कॉलेजला जात असताना दोन व्यक्तींनी बाईकवरुन येत तिच्यावर अॅसिड हल्ला केला. यानंतर तिच्या शरीराची जळजळ होऊ लागली. आरोपींची ओळख पटण्यापूर्वीच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र पीडित तरुणी घटनास्थळी गंभीर अवस्थेत तेथेच निपचित पडली होती. स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करुन पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.(आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर रोम मध्ये अ‍ॅसिड हल्ला) 

ANI Tweet: 

तर काही दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ती तरुणीचा पाठलाग करत होते. मात्र यावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान तरुणीनेने केलेले नाही. परंतु ही गोष्ट पीडितेच्या नातेवाईकांना पोलिसांनी सांगितली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement