My Preferred CIDCO Home Scheme: ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेमध्ये 26,502 घरांसाठी रजिस्ट्रेशन cidcohomes.com वर सुरू; पहा पात्रता निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्जदारांना या सोडतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
दसर्याच्या मुहूर्तात ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ (My Preferred CIDCO Home Scheme) या नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये घर घेणार्यांच्या योजनेला सुरूवात झाली आहे. नवी मुंबई मध्ये सिडको च्या 26,502 घरांसाठी रजिस्ट्रेशन 12 ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे. cidcohomes.com या अधिकृत वेबसाईट वर यासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान नवी मुंबई मध्ये सर्वसामान्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी सिडको कडून जाहीर करणयत आलेल्या या योजनेला पहिल्या 24 तासांत 12,400 ऑनलाईन अर्जांचा प्रतिसाद मिळाला आहे. सिडकोच्या या सोडती मध्ये अर्जदारांना आपलं हवं असलेलं घर निवडता येणार आहे.
सिडको कडून जारी या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’योजनेमधील घरं वाशी, तळोजा, खारघर, खांदेश्वर, पनवेल, उल्वे या भागात आहे. ही घरं रेल्वे स्थानकांजवळ उपलब्ध करून देण्यात आली असल्याने याबाबत विशेष उत्सुकता आहे.
‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’योजनेत घर घेण्यासाठी पात्रता निकष काय?
- अर्जदार किमान 18 वर्षांचा असावा.
- महाराष्ट्रामध्ये किमान 15 वर्ष वास्तव्य असावं.
- EWS flats साठी मासिक उत्पन्न 25 हजारांपर्यंत असावं.
- LIG flats साठी 25 ते 50 हजार पर्यंत असावं.
- महाराष्ट्रात अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबात अन्य कोणाचे सरकारी घर नसावं.
सिडको घरांसाठी आवश्यक कागदपत्र कोणती?
- ओळखीच्या व्हेरिफिकेशन साठी आधार कार्ड किंवा पॅन असणं आवश्यक
- उत्पन्नाच्या दाखल्यासाठी टॅक्स रिटर्न किंवा सॅलरी स्लिप असणं आवश्यक
- निवासी पुरावा म्हणून डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे.
- पेमेंटच्या प्रक्रियेसाठी बॅंकेचे तपशील आवश्यक आहे.
सिडको च्या लॉटरीसाठी अर्ज कसा कराल?
- सिडकोच्या अधिकृत वेबसाईट cidcohomes.com वर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
- लॉटरीच्या 3 राऊंड्ससाठी तुम्हांला 15 प्राधान्यक्रम निवडण्याची मुभा आहे.
- प्रत्येक राऊंड मध्ये 1 ते 5 पर्याय निवडले जाऊ शकतात.
- प्रत्येक ठिकाणी विशिष्ट मजले आणि टॉवरसाठी जास्तीत जास्त 3 प्राधान्यक्रम निवडले जाऊ शकतात.
- लोकेशन निवडण्यासाठी निर्बंध नाहीत पण एका राऊंड मध्ये 5 पेक्षा अधिक प्राधान्यक्रम निवडता येऊ शकत नाहीत.
- प्राधान्यक्रम निवडल्यानंतर हाऊसिंग कॅटेगरी नुसार, बुकिंग अमाऊंट भरा.
- EWS साठी 75,000 रू + GST, LIG 1 BHK साठी 1,50,000 + GST आणि LIG 2 BHK साठी 2,00,000 + GST भरावे लागणार आहेत.
रजिस्ट्रेशन आणि पेमेंट पिरेड संपल्यानंतर सिडको पात्र उमेदवारांची ड्राफ्ट लिस्ट जारी करणार आहे. अर्जदारांना या सोडतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.