MVA Mumbai Morcha: महाविकासआघाडीचा महाविराट मोर्चा, मुंबईत आज विरोधकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबईतील भायकळा येथील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारत असा एक दीर्घ मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून मोर्चाला सुरुवात होईल.

MVA Mumbai Morcha | (Photo Credit - Twitter/@ShivSena)

MVA Mumbai Morcha: महाविकासआघाडीचा (Maha Vikas Aghadi) महामोर्चा आज (17 डिसेंबर) मुंबईत धडकणार आहे. मुंबईतील भायकळा येथील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारत असा एक दीर्घ मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चाच्या (MVA March Mumbai ) पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तौनात करण्यात आला आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाहतूकीतही मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. शहरात निघणारा महामोर्चा आणि शहराची वाहतूक अशी दुधारी तलवार मुंबई पोलिसांना आज सांभाळावी लागणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनात पक्षाच्या विविध नेते आणि प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच, इतरही महापुरुष आणि वंदनीय व्यक्तीमत्वाबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली. या वक्तव्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांकडून म्हणजेच महाविकासआघडी द्वारे विराट मोर्चा काढण्यात येत आहे. (हेही वाचा, Mahavikas Aghadi Mahamorcha: महाविकास आघाडी महामोर्चासाठी सज्ज तर मुंबई पोलिसांकडून विशेष नियमावली जारी)

छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय व्यक्तीमत्वांबाबत राज्यपाल आणि भाजप यांच्याकडून वारंवार अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. शिवाय राज्यातील उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादावरुन वारंवार महाराष्ट्राला डिवचत आहेत. राज्यातील अनेक गावे इतर राज्यांमध्ये समाविष्ठ करण्याबाबत कारस्थाने केली जात आहेत. तरीही याबद्दल राज्य आणि केंद्र सरकार कोणतीही दखल घेत नाहीत. जनतेच्या भावनांशी त्यांना काहीही घेणेदेणे नाही. त्याविरोधात महाराष्ट्रप्रेमींचा विराट मोर्चा आज मुंबईत निघत आहे, अशी प्रतिक्रिाय संजय राऊत यांनी दिली आहे.

ट्विट

महाविकासआघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळणार की नाही? याबाबत साशंकता होती. त्यावरुन राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क लढवले जात होते. चर्चा होत्या. मात्र, मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली. महाविकासआघाडी नेत्यांकडून केलेल्या अर्जावरुन मुंबई पोलिसांनी मोर्चाला लिखीत स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. मविआच्या नेत्यांनीही आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मोर्चाला परवानगी मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच, जरी परवानगी मिळाली नाही, तरीदेखील आम्ही विराट मोर्चा काढणारच असा पवित्राही मविआने घेतला होता.