Nagpur: कुटुंबातील पाच जणांची हत्या, कुटुंबप्रमुखाची आत्महत्या; नागपूर येथील धक्कादायक प्रकार
त्यांनी आपल्या राहत्या घरात आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. या हत्येनंतर माथुरकर इतक्यावरच थांबला नाही. त्याने घरापासून काहीच अंतरावर राहात असलेल्या सासू आणि मेहुणीची हत्या केली. या सर्वांची हत्या केल्यानंतर माथुरकर पुन्हा आपल्या घरी आला. राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
राज्याची राजधानी नागपूर शहर (Nagpur City) आज एका धक्कादायक प्रकाराने हादरुन गेले. एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींची हत्या केल्यानंतर त्याच कुटुंबातील कुटुंबप्रमुखाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागपूर सुन्न झाले आहे. नागपूर येथील पाचपावली परिसरात ही घटना आज (सोमवार, 21 जुून) उघडकीस आली. या घटनेत कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. पाचपावली (Pachpaoli) परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घनटास्थळी दाखल झाले आहेत. हत्या आणि आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही घटना कौटुंबीक कलहातून घडली असावी, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. नागपूर पोलीस (Nagpur Police) पुढील तपास करत आहेत.
घटनेबाबत माहिती अशी की, नागपूर शहरातील पाचपावली परिसरात अलोक माथुरकर हे आपल्या कुटुंबीयांसह राहात होते. त्यांनी आपल्या राहत्या घरात आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. या हत्येनंतर माथुरकर इतक्यावरच थांबला नाही. त्याने घरापासून काहीच अंतरावर राहात असलेल्या सासू आणि मेहुणीची हत्या केली. या सर्वांची हत्या केल्यानंतर माथुरकर पुन्हा आपल्या घरी आला. राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (हेही वाचा, बारामती: माहेरहून सोने आणले नाही म्हणून सूनेची हत्या, सासरच्या घरासमोर घरातल्यांनी केले अंतिमसंस्कार)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार काल (रविवार, 20 जून) रात्री घडला. जो सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थलाचा पंचनामा करत सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तेथे या मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. हत्या आणि आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. परंतू, कौटुंबीक वादातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.