Mumbai Water Cut: उद्यापासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईकरांना पाणी आता काही दिवस पाणी संभाळून वापरण्याची गरज आहे. कारण संपूर्ण मुंबईत उद्या सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर असे तेरा दिवस ही पाणी कपात असेल. या पाणीकपातीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर समस्येचा सामना हा करावा लागू शकतो.  या पाणीकपातीचा फटका हा इतर महानगर पालिकेला देखील होणार आहे.  ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.  (हेही वाचा - Mumbai Accident: परळमध्ये भरधाव बाईकने टॅक्सीला धडक दिल्याने भीषण अपघात, 24 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, 1 जण जखमी)

मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ही पाणीकपात लागू ही करण्यात आली आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif