Mumbai Western Railway Mega Block Update: लोअर परळ येथून पहिली एक्सप्रेस रवाना, पश्चिम रेल्वेमार्गावरील काम दिलेल्या वेळेत पूर्ण

सकाळी 7.40 मिनिटांनी अवंतिका एक्सप्रेस रवाना झाली आहे.

Western Railway Mega block Update (Photo Credits-Twitter)

Mumbai Western Railway Mega Block Update: पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक संपला असून पहिली एक्सप्रेस लोअर परळ येथून रवाना झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. सकाळी 7.40 मिनिटांनी अवंतिका एक्सप्रेस रवाना झाली आहे. परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढून नवीन टाकण्यासाठी शनिवार (2 फेब्रुवारी) आणि रविवारी (3 फेब्रुवारी) रोजी तब्बल 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. तर गर्डनचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

डिलाई रोड येथील लोअर परेल पुलाच्या बांधकामासाठी शनिवार (2 फेब्रुवारी) आणि रविवारी (3 फेब्रुवारी) या दोन दिवशी लोकल ट्रेनसाठी 11 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता. तर काल रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून बदलेले वेळापत्रक ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले होते.

दरम्यान,अंधेरीच्या गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर प्रसाशानाने धोकादायक पुलांचे काम हाती घेतले. यात लोअर परळचा डेलीस पूल गंजला असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी पूल तोडण्यासाठी मोठमोठ्या क्रेन मदतीसाठी आणल्या होत्या. यासाठी दादर ते चर्चगेट रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif