Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!
मुंबईत आज 30 जून 2024 रोजी तापमान 28.78 अंश सेल्सिअस आहे.
Mumbai Weather Prediction, July 1: IMD ने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आज 30 जून 2024 रोजी तापमान 28.78 अंश सेल्सिअस आहे. दिवसाचा अंदाज किमान तापमान 27.99 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 28.98 अंश सेल्सिअस दर्शवितो. शनिवारी अनेक भगत मुंबईत पाऊस पडला,IMD च्या आकडेवारीनुसार सांताक्रूझ येथे 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कुलाबा एकूणच या कालावधीत मुंबईत 44.7 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 41.89 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 26.68 मिलीमीटर पाऊस पडला. मुंबईत व मुंबई उपनगरात सतत कसळणाऱ्या पावसाने आता सकाळपासून थोडी शांतता घेतली आहे पण मात्र,आज पूर्ण दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहील व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे. मुंबईस, मुंबई उपनगर,ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे. हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.व समुद्रकिनारी नागरिकांना जाण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान विभागने मुंबई चा उद्याचा हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा:Kokan Weather Forecast For Tomorrow:कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
सोबतच आज रत्नागिरी, रायगड व पुणे ह्या जिल्हयान ऑरेंज अलर्ट जारी करणायात आला आहे. पुढील आठवड्यात मुंबईत ढगांच्या व गडगडाटासह माध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे लवकर आगमन झाले असले तरी मुंबईकरांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.मुसळधार पर्जन्यवृष्टीचा हा कालावधी कायम राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मुंबईतील रहिवाशांना दिलासा आणि आव्हाने दोन्ही मिळतील.