Rains and Monsoon | (Photo Credit -Latestly Marathi)

Mumbai Rains Update: मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसान पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे आता वातावरणात थोडासा गारवा जाणवतो. चातका प्रमाणे वाट पाहणाऱ्या लोकांना नक्कीच पावसाने आपली हजेरी लावली त्याच्या आनंद आहे. परंतु काही ठिकाणी पावसाचं आगमन होताच,पहिल्याच मुसळधार पावसात जीवितहानीचं वृत्त देखील समोर आले आहे. तसंच आज मुंबईत काही ठिकाणी पाऊस आणि वारा असणार आहे. आज मुंबई शहरात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागानुसार, आज वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पाऊस आणि वारा असणार आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर कृपया हवामान अंदाज पाहून घरच्या बाहेर जाण्याचे नियोजन कारा. आता उद्या नेमक वातावरण कसं असेल  त्यासाठी हवामान विभागाने मुंबई शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे हेही वाचा: Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण; पहा भरती, ओहोटीच्या वेळा

 

 

मुंबईतील पुढील ७ दिवसांचे हवामान आणि AQI अंदाज:

तारीख तापमान आकाश

12 जून 2024 28.6 °C मध्यम पाऊस

13 जून 2024 29.38 °C हलका पाऊस

14 जून 2024 29.27 °C हलका पाऊस

15 जून 2024 29.19 °C हलका पाऊस

16 जून 2024 29.75 °C हलका पाऊस

17 जून 2024 29.65°C हलका पाऊस

18 जून 2024 28.89 °C मध्यम पाऊस

 

तसेच मुंबईत आज 11 जून 2024 रोजी तापमान 27.53 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान 26.99 °C आणि 29.62 °C दर्शवतो.